३७ वी राष्ट्रीय स्पर्धा, गोवा (२०२३) महाराष्ट्राला दुहेरी चषक
दि. ४ ते ८ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत फोंडा इनडोअर स्टेडीयम, फोंडा, गोवा येथे संपन्न झालेल्या ३७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी प्रतिस्पर्धी ओडीसा संघास एकतर्फी नमवून सहजगत्या दुहेरी विजय संपादन केला.
महाराष्ट्राचे यशस्वी संघ….
पुरुष संघ – सुयश गरगटे, आदित्य गणपुले, राहुल मंडल, वृषभ वाघ (पुणे), अक्षय भांगरे, ओंकार सोनावणे, हृषीकेश मुर्चावडे (मुंबई उपनगर), लक्ष्मण गवस, संकेत कदम (सर्व ठाणे), अक्षय मसाळ, सौरभ घाडगे (सर्व सांगली), रामजी कश्यप (सोलापूर), फेझांखा पठाण (विदर्भ), सुशांत काळढोण, निखील मस्के (सर्व कोल्हापूर)
राखीव खेळाडू – दिलीप खांडवी (नाशिक), अभिजित पाटील (कोल्हापूर), दुर्वेश साळुंखे (मुंबई उपनगर)
प्रशिक्षक – श्री. डलेश देसाई (मुंबई), सहाय्यक प्रशिक्षक – श्री. युवराज जाधव (सांगली), व्यवस्थापक – श्री. प्रशांत इनामदार (सांगली), फ़िजिओ – डॉ. अमित राव्ह्टे (सांगली)
महिला संघ – प्रियांका भोपी, पूजा फरागडे, रुपाली बडे, रेश्मा राठोड (सर्व ठाणे), किरण शिंदे, गौरी शिंदे, ऋतुजा खरे, संपदा मोरे (सर्व धाराशिव), काजल भोर, प्रियांका इंगळे, दिपाली राठोड (सर्व पुणे), निशा वैजाळ (नाशिक), प्रिती काळे (सोलापूर), प्रतीक्षा बिराजदार (सांगली), पायल पवार (रत्नागिरी)
राखीव खेळाडू – स्नेहल जाधव (पुणे), अश्विनी शिंदे (धाराशिव), वैष्णवी पोवार (कोल्हापूर)
प्रशिक्षक – श्री. नरेंद्र मेंगळ (ठाणे), सहाय्यक प्रशिक्षक – श्री. जयांशु पोळ (जळगाव), व्यवस्थापिका – सुप्रिया गाढवे (धाराशिव)