राज्यस्तर खो खो पंच शिबीर (२०२३-२४)
दि. २९ व ३० जुलै, २०२३ या कालावधीत राज्यस्तर खो खो पंच शिबीर (२०२३-२४) जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे (पश्चिम) येथे पार पडले. सदर शिबीर महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अधिपत्याखाली दि अम्यॅच्युअर खो खो असोसिएशन, ठाणे यांनी आयोजित केले होते.
या शिबिराचे उद्घाटन ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. सुहास देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव डॉ. प्रा. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री. सचिन गोडबोले, सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा, असोसिएशनचे सहसचिव प्रा. राजेश सोनवणे, प्रा. पवन पाटील, श्री. जयांषु पोळ, डॉ. प्रशांत इनामदार, सौ. गंधाली पालांडे, आंतरराष्ट्रीय पंच, खो खो फेडरेशनचे ऑफ इंडियाचे पंच सचिव व शिवछत्रपती प्रशिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. प्रशांत पाटणकर, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व शिवछत्रपती प्रशिक्षक पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या तांत्रिक समितीचे सचिव डॉ. नरेंद्र कुंदर, असोसिएशनचे माजी सचिव श्री. संदीप तावडे, ठाणे जिल्हा सचिव श्री. मंदार कोळी, श्री. कमलाकर कोळी, शिवछत्रपती प्रशिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. अरविंद ठाणेकर आदि मान्यवर प्रसंगी उपस्थित होते.
या राज्य पंच शिबिरात राज्य पंच मंडळ अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री. श्रीकांत ढेपे. पंच मंडळ सचिव श्री. प्रशांत पाटणकर, राज्य पंच मंडळ सदस्य श्री. नानासाहेब झांबरे, श्री. महेश करमळकर या मान्यवरांनी उपस्थित पंचांना नवीन नियमावली, सामन्याचे नियम इत्यादी बाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले तर राज्य तांत्रिक समितीचे सचिव डॉ. नरेंद्र कुंदर, सदस्य श्री. निलेश परब, श्री. आशिष पाटील यांनी तांत्रिक बाबी, गुणपत्रक इत्यादीचे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मार्गदर्शन केले.
या शिबिराचा समारोप श्री. अविनाश सोलवट (उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार साहेब यांचे स्वीय सचिव) यांचे हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव डॉ. प्रा. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री. सचिन गोडबोले, सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा, खजिनदार अॅड. अरुण देशमुख, असोसिएशनचे सहसचिव प्रा. राजेश सोनवणे, प्रा. पवन पाटील, श्री. जयांषु पोळ, डॉ. प्रशांत इनामदार, सौ. गंधाली पालांडे, राज्य प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब तोरसकर, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुधीर थळे, जिल्हा सचिव श्री. मंदार कोळी, श्री. कमलाकर कोळी आदि मान्यवर प्रसंगी उपस्थित होते.
राज्यभरातून सुमारे २२५ पंच व अनेक मान्यवर या शिबिरास आवर्जून उपस्थित होते.