राज्यस्तरीय खो खो प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिर २०२३-२४ (धाराशिव)
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खो खो दिनानिमित्त दि. ३० जून ते ०२ जुलै, २०२३ या कालावधीत महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय खो खो प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन धाराशिव (उस्मानाबाद) येथे करण्यात आलेले होते.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्री. श्रीकांत कुंटला, जिल्हा नियोजन अधिकारी सौ. प्रीतम कुंटला, खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव डॉ. प्रा. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री. शाहूराज खोगरे, रहिमान काझी, अर्जुन पुरस्कार विजेत्या सौ. सारिका काळे, आंतरराष्ट्रीय पंच व फेडरेशनचे पंच सचिव श्री. प्रशांत पाटणकर, असोसिएशनचे सहसचिव प्रा. राजेश सोनवणे, प्रा. पवन पाटील, श्री. जयांषु पोळ, डॉ. प्रशांत इनामदार, असोसिएशनचे माजी सचिव श्री. संदीप तावडे, धाराशिव जिल्हा सचिव श्री. प्रवीण बागुल आदि मान्यवर उपस्थित होते.
या राज्यस्तरीय खो खो प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिरात संपूर्ण महाराष्ट्रातून प्रशिक्षक उपस्थित होते. त्यांना डॉ. प्रा. चंद्रजीत जाधव, अॅड. गोविंद शर्मा, सौ. सारिका काळे, श्री. बिपीन पाटील, श्री. राजेंद्र साप्ते, डॉ. नरेंद्र कुंदर, श्री. मयूर पालांडे, श्री. एजास शेख, श्री. शिरीन गोडबोले या मान्यवरांनी प्रशिक्षण दिले.
याप्रसंगी आहार तज्ञ डॉ. अपूर्वा कुंभकोणी, फ़िजिओ डॉ. काश्मीरा सबनीस, फिटनेस प्रशिक्षक श्री. राहुल यादव, डॉ. मुकुल कुटाळे यांनी प्रशिक्षकांना व्यायाम, शारीरिक तंदुरुस्त, आहार वॉर्म अप प्रकार याबाबतचे बहुमुल्य मार्गदर्शन केले जे खेळाडूंकरीता अतिशय महत्वाचे ठरेल.