दि. २० ते २३ मार्च, २०२३ या कालावधीत ४ थ्या आशियाई अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे आयोजन तामुलपूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, गुवाहाटी आसाम येथे करण्यात आले होते.

या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने नेपाळ संघावर विजय संपादन केला तर महिला संघाने नेपाळ संघावर एकतर्फी विजय संपादन करून आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा दबदबा कायम ठेवला.

या स्पर्धेत भारतीय संघात महाराष्ट्रातील खेळाडूंची निवड करण्यात आली होती. पुरुष संघात अक्षय भांगरे, सुयश गरगटे व अनिकेत पोटे, अक्षय गणपुले तर महिला संघात प्रियंका इंगळे, गौरी शिंदे, निकिता पवार व अपेक्षा सुतार यांची निवड झाली होती. भारताच्या पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी श्री. मयूर पालांडे व संघाचे फिजीयोथेरेपिस्ट म्हणून डॉ. अमित रव्हाटे यांची निवड करण्यात आलेली होती.

महाराष्ट्रातील या खेळाडूंचा सत्कार आज महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री श्री. गिरीश महाजन तसेच महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे आश्रयदाते व विरोधी पक्ष नेते आदरणीय नामदार श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते विधान भवन, मुंबई येथे करण्यात आला.

या प्रसंगी खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव डॉ. प्रा. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस अ‍ॅड. गोविंद शर्मा, मुंबई खो खो संघटनेचे सचिव श्री. सुरेंद्रकुमार विश्वकर्मा, श्री तुषार मोरे हे मान्यवर उपस्थित होते.