५ व्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धत अॅड. गोविंद शर्मा यांची तांत्रिक संचालक पदी निवड….
दि. ३० जानेवारी ते ११ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत सायकलिंग कॉम्प्लेक्स, राणीतल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जबलपूर, मध्य प्रदेश येथे भारत सरकार युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालय व स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या वतीने ५ व्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर स्पर्धेत खो खो विभागाच्या तांत्रिक संचालक पदी महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा यांची निवड करण्यात आली आहे.