४१ वी कुमार – मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा​ – २०२२ पश्चिम बंगाल खो खो असोसिएशनच्या वतीने दि. २६ ते ३० डिसेंबर, २०२२ या कालावधीत खामारपारा सिशु मैदान, बंस्बेरीया, हुगळी, पश्चिम बंगाल येथे पार पडली.

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कुमार संघाने दिल्ली संघावर तर मुली संघाने ओडीसा संघावर मात करत अंतिम विजयावर​ दुहेरी शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्राच्या कुमार संघाचा राष्ट्रीय स्पर्धेतील ३३ तर मुलींचा २७ वा विजय होता.

या स्पर्धेत कु. किरण वसावे (उस्मानाबाद) याला सर्वोकृष्ट खेळाडूचा वीर अभिमन्यू पुरस्कार तर कु. प्रिती काळे (सोलापूर) हिला सर्वोकृष्ट खेळाडूचा जानकी पुरस्कार प्राप्त झाला.