दि. २० ते २४ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत द उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशनने महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अधिपत्याखाली व भारतीय खो खो महासंघाच्या मान्यतेने ५५ व्या पुरुष व महिला गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे यशस्वी आयोजन श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, उस्मानाबाद येथे केले होते.

स्पर्धेचे उद्घाटन विधान सभेचे विरोधी पक्षनेते व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष मा. नामदार श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष श्री. महेश गादेकर, उपाध्यक्ष व आमदार श्री. अभिमन्यू पवार, आमदार श्री. श्रीकांत  भारतीय, पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त श्री. शाहूराज खोगरे, अर्जुन पुरस्कार प्राप्त सौ. सारिका काळे, उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अनिल खोचरे, सचिव श्री. प्रवीण बागल यांच्या सोबत अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा विधान परिषद विरोधी पक्ष नेते नामदार श्री. अंबादास दानवे यांच्या हस्ते झाला. यावेळी खासदार श्री. ओमराजे निंबाळकर, खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव श्री. महेंद्रसिंग त्यागी, सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस अ‍ॅड. गोविंद शर्मा यांच्या सोबत अनेक मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या पुरुष संघाने उपांत्य फेरीत कोल्हापूर संघास हरवून अंतिम फेरी प्रवेश मिळविला तर महिला संघाने दिल्ली संघास हरवून स्पर्धेतील अंतिम फेरी गाठली.

अंतिम फेरीत महाराष्टाच्या पुरुष संघास भारतीय रेल्वे संघाने मात देत विजय संपादन केला.

महाराष्ट्राच्या महिला संघाने अंतिम फेरीत एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया या संघावर मात करीत एकतर्फी विजय मिळविला.

स्पर्धातील सर्वोकृष्ट पुरुष खेळाडूचा एकलव्य पुरस्कार भारतीय रेल्वेच्या अक्षय गणपुले याला देण्यात आला तर महिला गटातील सर्वोकृष्ट खेळाडूचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार महाराष्ट्राच्या अपेक्षा सुतार हिला देण्यात आला.

सर्वोकृष्ट पुरुष संरक्षक – रामजी कश्यप (महाराष्ट्र)                             सर्वोकृष्ट महिला संरक्षक – रेश्मा राठोड (महाराष्ट्र)

सर्वोकृष्ट पुरुष आक्रमक – विजय हजारे                                           सर्वोकृष्ट महिला आक्रमक – नसरीन (एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया)

अष्टपैलू पुरुष खेळाडू – अक्षय गणपुले                                              अष्टपैलू महिला खेळाडू – अपेक्षा सुतार (महाराष्ट्र)