फलटण येथे पार पडलेल्या ३२ व्या किशोर – किशोरी गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत विजयश्री प्राप्त करत दुहेरी चषक मिळविला.

दि. २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत भारतीय खो  खो महासंघाच्या मान्यतेने महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अधिपत्याखाली सातारा जिल्हा अम्चुअर खो खो असोसिएशन ने ३२ व्या किशोर – किशोरी गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे आयोजन श्रीमंत विजयसिंहराजे उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुल, घड्सोली,  फलटण, जिल्हा सातारा येथे करण्यात आले होते.

सदर स्पर्धेतील सर्व सामने महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी एकतर्फी जिंकत सुवर्ण चषकाचे मानकरी असल्याचे दाखवून दिले होते.

महाराष्ट्राच्या किशोर संघाने कर्नाटकावर एक डाव ६ गुणांनी तर किशोरी संघाने कर्नाटकावर एक डाव ४ गुणांनी विजय मिळविला. महाराष्टाच्या दोन्ही संघांचा हा राष्ट्रीय स्पर्धेतील सलग सातवा विजय आहे.

स्पर्धातील सर्वोकृष्ट किशोर खेळाडूचा भरत पुरस्कार उस्मानाबादच्या (महाराष्ट्र) कु. राज जाधव याला मिळाला तर किशोरी गटातील सर्वोकृष्ट खेळाडूचा इला पुरस्कार ठाण्याच्या (महाराष्ट्र) कु. धनश्री कंक हिला मिळाला.