संस्कारधाम इनडोअर स्टेडीयम, अहमदाबाद येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघाने विजेतपद मिळवीत दुहेरी चषक प्राप्त केला.

महाराष्ट्राच्या महिलांचा अंतिम सामना ओडिशा या संघाबरोबर झाला. महाराष्ट्राने हा सामना १८ – ८ असा एक डाव व १० गुणांनी एकतर्फी जिंकला. या सामन्यात रुपाली बडे, प्रियांका भोपी, प्रियांका इंगळे, ऋतुजा खरे, रेश्मा राठोड, संपदा मोरे  यांनी उल्लेखनीय कामगिरी करत संघाच्या विजयास हातभार लावला.

तर महाराष्ट्राच्या पुरुषांच्या अंतिम सामना केरळा या संघाबरोबर झाला. महाराष्ट्राने हा सामना ७ मिनिटे व ४ गुणांनी एकतर्फी जिंकला. चुरशीच्या लढतीत अक्षय भांगरे, रामजी कश्यप, हृषीकेश मुर्चावडे, सुयश गरगटे, प्रतिक वाईकर व लक्ष्मण गवस यांनी भरदार खेळ करत संघाला विजय मिळवून दिला.