४ थी दक्षिण आशियाई व १ ली विश्वचषक खो खो स्पर्धा

४ थी दक्षिण आशियाई खो खो स्पर्धा दि. १२ ऑक्टोबर, २०२२ पासून तर १ ली विश्वचषक खो खो स्पर्धा दि. १६ ऑक्टोबर, २०२२ पासून दिल्ली येथे सुरु होईल असे भारतीय खो खो महासंघाकडून  वर्तविले जात आहे.

या दोन्ही स्पर्धांसाठी जे संघ निवडले जाणार आहेत त्यासाठी तज्ञ अश्या निवड समितीची घोषणा महासंघाकडून करण्यात आली आहे. भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांची या निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री. सचिन गोडबोले व सरचिटणीस श्री. गोविंद शर्मा यांची निवडी समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उपकार सिंग (पंजाब), एस. एस. मलिक (दिल्ली), डॉ. मुन्नी जून (दिल्ली) व सुषमा सारोलकर (मध्य भारत) यांची निवड समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बालेवाडी, पुणे येथे श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल मध्ये दि. ६ ते १९ जुलै या कालावधीत प्रशिक्षण शिबीर आयोजीत करण्यात आलेले आहे. भारतातून १२० मुलांची यात निवड करण्यात आली असून त्यातूनच या दोन्ही स्पर्धाकरीता खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.