राज्य पंच शिबीर, सोलापूर (२०२२-२३)
राज्य पंच शिबीर (२०२२-२३)
महाराष्ट्र खो खो असोसिएशन, सोलापूर अॅम्युचर खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व कास्ट्राईब शिक्षक संघटना – शाखा सोलापूर यांचे वतीने चालू वर्ष २०२२-२३ च्या राज्य पंच शिबिराचे आयोजन दिनांक २८ व २९ मे, २०२२ रोजी नूतन मराठी विद्यालय प्रशाला, सोलापूर येथे आयोजीत करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन आमदार श्री. यशवंत माने यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी उद्योजक श्री. सुधीर खटरमल, भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. सचिन गोडबोले, सरचिटणीस श्री. गोविंद शर्मा, खजिनदार श्री. अरुण देशमुख, दुध संघाचे व्हाईस चेअरमन श्री. दिपक माळी, शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार प्राप्त श्री. श्रीकांत ढेपे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. श्रीशैल कोरे, राज्य संघटनेच्या उच्च सल्लागार समितीचे श्री. तुषार सुर्वे, श्री. कमळाकर कोळी, स्पर्धा समितीचे कार्यकारी अध्यक्ष श्री. संदीप तावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या पंच शिबिरात राज्तयातील २४ जिल्ह्यांतील तब्बल ३३१ पंचानी सहभाग घेतला होता. या शिबिरात नवीन पंच तसेच जुने पंच सहभागी झालेले होते. पंच मंडळाचे सचिव श्शिरी. प्बिरशांत पाटणकर व तांत्रारिक समितीचे अध्यक्ष डॉ. प्रा. नागनाथ गजमल यांनी शिबिरादरम्यान विविध चर्चा सत्रे आयोजीत करून नवीन पंचांच्या नियमाबाबतील अस्पष्टता दूर केली. यात स्लाईड शो, पूर्वीच्या सामन्यातील चलचित्रे, गुणपत्रक इत्यादी दाखवून त्यातील निर्णयाबाबत देखील चर्चा करण्यात आली. मैदानात देखील प्रत्यक्ष सादरीकरण करून संभ्रम असणाऱ्या निर्णयाबाबत स्पष्टता करण्यात आली.
या शिबिराच्या समारोपास राज्य संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष मा. श्री. महेश गादेकर, श्री. विजयराव मोरे, कार्याध्यक्ष श्री. सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. अरुण देशमुख, संयुक्त कार्यवाह श्री. प्रा. राजेश सोनवणे, डॉ. पवन पाटील, श्री. जयांषु पोळ, डॉ. प्रशांत इनामदार, सौ. गंधाली पालांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शिबिरातील उपस्थित काही पंचांनी आपली मनोगत व्यक्त करत राज्य पंच मंडळ समिती व तांत्रिक समिती सदस्यांचे उत्तम मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.