५४ वी पुरुष व महिला गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा (२०२१-२२) खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने दिनांक २६ ते ३० डिसेंबर, २०२१ या कालावधीत मध्य प्रदेश खो खो असोसिएशनने MLB खेल परिसर, राईट टाऊन, जबलपूर, मध्य प्रदेश येथे आयोजीत केली होती.

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने स्पर्धेतील प्रथम स्थान तर पुरुष संघाने द्वितीय स्थान प्राप्त केले. पुरुषांमध्ये भारतीय रेल्वेने प्रथम स्थान व महिलांमध्ये एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या संघाने द्वितीय स्थान मिळविले.
या स्पर्धेतील सर्वोकृष्ट पुरुष खेळाडूचा – एकलव्य पुरस्काराचा मान भारतीय रेल्वेच्या महेश शिंदे तर महिला गटात सर्वोकृष्ट महिला खेळाडूचा – राणीलक्ष्मी बाई पुरस्काराचा मान महाराष्ट्राच्या प्रियांका इंगळे हिला मिळाला