खो खो दिन – २०२१
भारतीय खेळाचे भाग्यविधाते सन्मानीय खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व खो खो दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या वतीने पालखी मैदान, वेळापूर, ता. माळशिरस, जिल्हा – सोलापूर येथे पार पडलेल्या ५७ व्या पुरुष / महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धेस उपस्थित असलेल्या शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा सत्कार स्पर्धेचे आयोजक श्री. उत्तमराव जानकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
त्याची काही क्षणचित्रे …
तसेच २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर, २०२१ या कालावधीत उना, हिमाचल प्रदेश येथे पार पडलेल्या किशोर व किशोरी गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत सर्वोकृष्ट किशोरी खेळाडूचा इला पुरस्कार प्राप्त केलेल्या सांगली जिल्ह्याच्या कु. सानिका चाफे हिचाही सत्कार करण्यात आला.