५७ वी पुरुष महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा
५७ वी पुरुष महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा यंदा महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने दि सोलापूर अम्युचर खो खो असोसिएशनने अर्धनारी नटेश्वर क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ, वेळापूर यांच्या सहकार्याने दि. ११ ते १३ डिसेंबर, २०२१ या कालावधीत पालखी मैदान, वेळापूर, ता. माळशिरस, जिल्हा – सोलापूर., सोलापूर येथे आयोजित केली होती.
पुणे जिल्हा खो खो असोसिएशनने या स्पर्धेत पुरुष व महिला गटात विजेते पद मिळविले. पुरुष गटात मुंबई उपनगर (द्वितीय), सांगली (तृतीय), ठाणे (चतुर्थ) तर महिलांच्या गटात ठाणे (द्वितीय), उस्मानाबाद (तृतीय) तर रत्नागिरी (चतुर्थ) स्थानावर राहिले.
यावर्षीचा राजे संभाजी पुरस्काराचा मान पुरुष गटात पुणे जिल्ह्याच्या प्रतिक वाईकर याला तर राणी अहिल्या पुरस्काराचा मान महिला गटात पुणे जिल्हयाच्या प्रियांका इंगळे हिला प्राप्त झाला.