शुक्रवार दिनांक ८ ऑक्टोबर, २०२१ रोजी सकाळी १० वाजता PYC जिमखाना, भांडारकर रोड, डेक्कन, पुणे येथे गुण गौरव सोहळा महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे आश्रयदाते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान. नामदार श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या प्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष मा. आमदार श्री. अभिमन्यू पवार, मा. आमदार श्री. अनिकेत तटकरे, श्री. विजयराव मोरे, उपाध्यक्षा सौ. वैशाली लोंढे, सौ. ग्रीष्मा पाटील, भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री. सचिन गोडबोले, सरचिटणीस अ‍ॅड. गोविंद शर्मा, खजिनदार अ‍ॅड. अरुण देशमुख, सहकार्यवाह प्रा. डॉ. राजेश सोनावणे, श्री. जयांशु पोळ, प्रा. डॉ. पवन पाटील, डॉ. प्रशांत इनामदार, सौ. गंधाली पालांडे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.