४० वी कुमार – मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा – २०२१, ओरिसा
४० वी कुमार – मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा – २०२१ ओरिसा खो खो असोसिएशनच्या वतीने दि. २२ ते २६ सप्टेंबर, २०२१ या कालावधीत बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियम, KIIT युनिवर्सिटी, भुवनेश्वर, ओरिसा येथे पार पडली.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कुमार संघाने दिल्ली संघावर तर मुली संघाने कोल्हापूर संघावर मात करत अंतिम विजयावर दुहेरी शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्राच्या कुमार संघाचा राष्ट्रीय स्पर्धेतील ३२ तर मुलींचा २६ वा विजय होता.
या स्पर्धेत कु. आदित्य कुदळे (अहमदनगर) याला सर्वोकृष्ट खेळाडूचा वीर अभिमन्यू पुरस्कार तर कु. अश्विनी शिंदे (उस्मानाबाद) हिला सर्वोकृष्ट खेळाडूचा जानकी पुरस्कार प्राप्त झाला.
कुमार गट
सर्वोकृष्ट खेळाडू – आदित्य कुदळे (अहमदनगर)
सर्वोकृष्ट आक्रमक – पबानी साबर (ओरिसा)
सर्वोकृष्ट संरक्षक – रितिक (दिल्ली)
मुली गट
सर्वोकृष्ट खेळाडू – अश्विनी शिंदे (उस्मानाबाद)
सर्वोकृष्ट आक्रमक – वृषाली भोये (नाशिक)
सर्वोकृष्ट संरक्षक – वैष्णवी पोवार (कोल्हापूर)