भारतीय खो खो महासंघाने पश्चिम विभागाच्या प्रभारी अधिकारीपदी महासंघाचे सहसचिव व शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांची नेमणूक केली.
महासंघातर्फे सहा विभागांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर केल्या.
पश्चिम विभागांतर्गत गोवा, महाराष्ट्र, दमन व दिव, कोल्हापूर, विदर्भ, गुजरात व छत्तीसगढ अशी एकूण ७ राज्ये येतात.