डॉ. चंद्रजीत जाधव सर, श्री. गोविंद शर्मा सर व कु. सारीका काळे यांची खेलो इंडियाच्या खेळाडू निवड समिती सदस्य पदी निवड
भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव व महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे विश्वस्त डॉ. प्राचार्य श्री. चंद्रजीत जाधव, भारतीय खो खो महासंघाच्या कार्यकारी मंडळ सदस्य व राज्य संघटनेचे सरचिटणीस श्री. गोविंदजी शर्मा तसेच अर्जुन पुरस्कार विजेती कु. सारिका काळे यांची भारतीय खेळ प्राधिकरणतर्फे खेलो इंडियासाठी पश्चिम विभागातील गुणवंत खेळाडूंच्या निवड समिती सदस्य पदी निवड झाली.