५३ वी पुरुष व महिला गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा (२०१९-२०) खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने दिनांक २६ ते ३० डिसेंबर, २०१९ या कालावधीत छत्तीसगढ खो खो असोसिएशनने अलोन पब्लिक स्कुल, बेमातारा, छत्तीसगढ येथे आयोजीत केली होती.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघानी स्पर्धेतील द्वितीय स्थान प्राप्त केले. पुरुषांमध्ये भारतीय रेल्वे व महिलांमध्ये एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या संघाने अंतिम विजय मिळविला.
या स्पर्धेतील सर्वोकृष्ट पुरुष खेळाडूचा – एकलव्य पुरस्काराचा मान भारतीय रेल्वेच्या रंजन शेट्टी तर महिला गटात सर्वोकृष्ट महिला खेळाडूचा – राणीलक्ष्मी बाई पुरस्काराचा मान  एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वीणा एम. यांनी मिळविला.
 या स्पर्धेतील इतर सर्वोकृष्ट खेळाडू खालील प्रमाणे
सर्वोकृष्ट पुरुष संरक्षक – महेश शिंदे (महाराष्ट्र)
सर्वोकृष्ट पुरुष आक्रमक – विजय हजारे (भारतीय रेल्वे)
सर्वोकृष्ट महिला संरक्षक – अपेक्षा सुतार (महाराष्ट्र)
सर्वोकृष्ट महिला आक्रमक – परवीन  (एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया)