​​३९ वी कुमार – मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा​ – २०१९, वीर नर्म​दा पश्चिम गुजरात युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उधाणा मोगडुला रोड, सुरत, गुजरात येथे गुजरात खो खो असोसिएशनच्या वतीने दि. १९ ते २३ ऑक्टोबर, २०१९ या कालावधीत पार पडली.

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कुमार संघाने कोल्हापूर संघावर तर मुली संघाने कर्नाटक संघावर मात करत अंतिम विजयावर​ दुहेरी शिक्कामोर्तब केले.   

 या स्पर्धेत कु. दिलीप खांडवी (नाशिक) याला सर्वोकृष्ट खेळाडूचा वीर अभिमन्यू पुरस्कार तर कु. जान्हवी पेठे (उस्मानाबाद) हिला सर्वोकृष्ट खेळाडूचा जानकी पुरस्कार प्राप्त झाला.

कुमार गट 

सर्वोकृष्ट खेळाडू – दिलीप खांडवी (नाशिक)

सर्वोकृष्ट आक्रमक – शिवराम शिंगाडे (पुणे)

सर्वोकृष्ट संरक्षक – सौरभ अहिर (सांगली)  

मुली गट

सर्वोकृष्ट खेळाडू – जान्हवी पेठे (उस्मानाबाद)

सर्वोकृष्ट आक्रमक – वरलक्ष्मी (कर्नाटक)

सर्वोकृष्ट संरक्षक – रेश्मा राठोड (ठाणे)