३० वी किशोर – किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा ​झारखंड खो खो असोसिएशन यांच्या वतीने अलबर्ट एक्का खो खो स्टेडियम, मेगा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, खेलगाव, होतवर, रांची, झारखंड येथे दि. २ ते ६ ऑक्टोबर, २०१९ या कालावधीत पार पडली.

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघाने स्पर्धेतील सर्व आव्हान एकहाती मोडीत काढत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम लढतीत किशोर गटात महाराष्ट्राने ओडिसावर एकतर्फी विजय मिळविला. किशोरीच्या अंतिम सामन्यात ओडिसाने महाराष्ट्रावर विजय मिळविला. या स्पर्धेत महाराष्ट्राचा कुमार रवी वसावे याला सर्वोकृष्ट खेळाडूचा भरत पुरस्कार तर ओडिसाची कुमारी अनन्या प्रधान हिला सर्वोकृष्ट खेळाडूचा ईला पुरस्कार प्राप्त झाला.