महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने​ श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था, धुळे आयोजित व धुळे जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या अधिपत्याखाली ३६ वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा २०१९-२० दि. १९ ते २२ सप्टेंबर, २०१९ या कालावधीत तालुका क्रीडा संकुल, गरुड मैदान, धुळे येथे संपन्न झाली.

 

या स्पर्धेत किशोर गटात उस्मानाबाद तर किशोरी गटात पुणे जिल्ह्याने अजिंक्यपद मिळविले. या गटातील स्पर्धेत दोन्ही संघानी सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला.

 

या स्पर्धेतील सर्वोकृष्ट संरक्षक खेळाडूचा पुरस्कार कु. भरतसिंग वसावे (उस्मानाबाद), सर्वोकृष्ट आक्रमक खेळाडूचा पुरस्कार कु. चेतन बिळा (पुणे) तर स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार कु. रमेश वसावे (उस्मानाबाद) यास मिळाला.

 

तर मुलींच्या गटात सर्वोकृष्ट संरक्षक खेळाडूचा पुरस्कार कु. प्रांजली शेंडगे (पुणे), सर्वोकृष्ट आक्रमक खेळाडूचा पुरस्कार कु. ललिता गोबाले (नाशिक) तर स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार कु. भाग्यश्री बडे (पुणे) हिला मिळाला