युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय व स्पोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडिया (साई) यांच्या वतीने २ री खेलो इंडिया खो खो स्पर्धा – मुले (१७ व २१ वर्षाखालील) व मुली (१७ व २१ वर्षाखालील) आयोजीत करण्यात आली.
दिनांक १३ ते १७ जानेवारी, २०१९ या कालावधीत श्री शिव छत्रपती महाराज क्रीडांगण, बालेवाडी, पुणे येथे २ री खेलो इंडिया युथ गेम्सच्या अंतर्गत – खो खो स्पर्धा – मुले (१७ व २१ वर्षाखालील) व मुली (१७ व २१ वर्षाखालील) पार पडली.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या चारही संघानी स्पर्धेतील अंतिम विजेतेपद प्राप्त केले.