२९ वी किशोर – किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा रुद्रपुर स्टेडियम, रुद्रपुर, उत्तराखंड येथे उत्तराखंड खो खो असोसिएशनच्या वतीने दि. १५ ते १९ डिसेंबर, २०१८ या कालावधीत पार पडली.

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघाने स्पर्धेतील सर्व आव्हान एकहाती मोडीत काढत अंतिम विजयावर शिक्कामोर्तब केला.  किशोर संघाने तेलंगना संघावर केली तर किशोरी संघाने ओडीसा संघाला शह देत विजय मिळविला. या स्पर्धेत कुमार अजय काश्यप याला सर्वोकृष्ट खेळाडूचा भरत पुरस्कार तर कुमारी अमृता जगताप हिला सर्वोकृष्ट खेळाडूचा ईला पुरस्कार प्राप्त झाला.