३८ वी कुमार – मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा ग्राफाईट स्कूल, मंडीदीप, भोपाळ, मध्य प्रदेश येथे मध्यप्रदेश अम्याचर खो खो असोसिएशनच्या वतीने दि. २ ते ६ डिसेंबर, २०१८ या कालावधीत पार पडली.

या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कुमार व मुली संघाने स्पर्धेतील सर्व आव्हान मोडीत काढत अंतिम विजयावर शिक्कामोर्तब केला. कुमार संघाने कोल्हापूर संघावर मात करत सलग १४ वर्ष विजेतेपद राखले तर मुलींच्या संघाने कर्नाटक संघाला शह देत सलग ६ वर्षाचा विजय अबाधित ठेवला. या स्पर्धेत कुमार वृषभ वाघ (पुणे) याला सर्वोकृष्ट खेळाडूचा वीर अभिमन्यू पुरस्कार तर कुमारी रेश्मा राठोड (ठाणे) हिला सर्वोकृष्ट खेळाडूचा जानकी पुरस्कार प्राप्त झाला.