खो खो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने महाराष्ट्र खो खो असोसिएशन व ठाणे जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ​इंडो – नेपाळ टेस्ट सिरीज – २०१८ बुधवार दिनांक ३० मे, २०१८ रोजी शाहीर दामोदर विटावकर क्रीडांगण (पर्याचे मैदान), विटावा, ठाणे – बेलापूर रोड, कळवा, ठाणे, महाराष्ट्र येथे आयोजित ​करण्यात आली होती.

या स्पर्धेकरीता स्पर्धेचे आयोजन सचिव म्हणून महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सहकार्यवाह श्री. कमलाकर कोळी (ठाणे), भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून असोसिएशनचे सहकार्यवाह श्री. गोविंद शर्मा (छत्रपती संभाजीनगर) यांची तर महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे तांत्रिक समिती सदस्य डॉ. प्रशांत इनामदार (सांगली) यांची व्यवस्थापक म्हणून खो खो फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे नियुक्ती करण्यात आली होती. श्री. प्रशांत पाटणकर यांनी स्पर्धेच्या पंच प्रमुखाची जबाबदारी पार पाडली.

भारताच्या या संघात महाराष्ट्रातील सुयश गरगटे (पुणे), अक्षय भांगरे (मुंबई उपनगर), कृष्णा राठोड (उस्मानाबाद), संकेत कदम (ठाणे), सुरेश सावंत (सांगली) व पियुष घोलम (मुंबई) या खेळाडूंची निवड झाली आहे. उर्वरीत खेळाडू हे भारताच्या इतर राज्यातून होते.

राज्याचे सचिव श्री. चंद्रजीत जाधव सर यांच्यासह महाराष्ट्र खो खो असोसिएशन तसेच ठाणे जिल्हा खो खो असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हि स्पर्धा यशस्वी व भव्यदिव्य होण्यासाठी खूप मेहनत घेतली.