महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने​ ध्येय युथ फाऊन्डेशन आयोजित व द अम्युचर खो खो असोसिएशन, सांगली यांच्या अधिपत्याखाली ३४ वी किशोर व किशोरी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा २०१७-१८ दि. २२ ते २५ एप्रिल, २०१८ या कालावधीत शांतीनिकेतन लोकविद्यापीठ, सांगली येथे संपन्न झाली.

या स्पर्धेत किशोर गटात सोलापूर तर किशोरी गटात पुणे जिल्ह्याने अजिंक्यपद मिळविले.

या स्पर्धेतील सर्वोकृष्ट संरक्षक खेळाडूचा पुरस्कार विवेक ब्राम्हणे (पूणे), सर्वोकृष्ट आक्रमक खेळाडूचा पुरस्कार आदेश मोरे (सोलापूर) तर स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार अमन मुलानी (सोलापूर) यास मिळाला.

तर मुलींच्या गटात सर्वोकृष्ट संरक्षक खेळाडूचा पुरस्कार श्वेता वाघ (पुणे), सर्वोकृष्ट आक्रमक खेळाडूचा पुरस्कार संपदा मोरे (उस्मानाबाद) तर स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार ऋतुजा बल्लाळ (पुणे) हिला मिळाला.