भारतीय खो खो महासंघाच्या अधिपत्याखाली मणिपूर अम्युचर खो खो असोसिएशन आयोजीत ३७ वी कुमार / मुली गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा (२०१७-१८) बासू मैदान, खांगाबोक, जिल्हा थोउबल, जिल्हा मुख्यालयाजवळ, मणिपूर येथे दिनांक २६ ते ३० मार्च, २०१८ या कालावधीत पार पडली.
​या स्पर्धेत महाराष्टाच्या ​दोन्ही संघानी निर्विवादपणे ​स्पर्धेतील ​प्रथम क्रमांक ​प्राप्त करत दुहेरी मुकुट संपादन केला. ​महाराष्ट्राच्या कु. ​कोमल धारवटकर हिला राष्ट्रीय स्पर्धेतील ​मुली गटातील ​सर्वोकृष्ट ​खेळाडूचा ​जानकी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर ​कुमारांच्या गटात हा ​वीर अभिमन्यू पुरस्काराचा मान ​महाराष्ट्राच्याच कु. शुभम उतेकर या खेळाडूस मिळाला.