४५ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा २०१७-१८
महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने रत्नागिरी जिल्हा खो खो असोसिएशनच्या वतीने ४५ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा २०१७-१८ दि. २३ ते २६ डिसेंबर, २०१७ या कालावधीत जोशी मैदान, भोगाळे, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे संपन्न झाली.
या स्पर्धेत कुमार गटात सांगली तर मुली गटात पुणे जिल्ह्याने अजिंक्यपद मिळविले.
या स्पर्धेतील सर्वोकृष्ट संरक्षक खेळाडूचा पुरस्कार सागर गायकवाड (सांगली), सर्वोकृष्ट आक्रमक खेळाडूचा पुरस्कार ओमकार सोनावणे (मुंबई उपनगर) तर स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार प्रथमेश शेळके (सांगली) यास मिळाला.
तर मुलींच्या गटात सर्वोकृष्ट संरक्षक खेळाडूचा पुरस्कार कोमल दारवटकर (पुणे), सर्वोकृष्ट आक्रमक खेळाडूचा पुरस्कार रेश्मा राठोड (ठाणे) तर स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार प्रियांका इंगळे (पुणे) हिला मिळाला.