भारतीय खो खो संघाच्या मान्यतेने तेलंगणा खो खो असोसिएशनच्या वतीने २८ वी फेडरेशन चषक राष्ट्रीय पुरुष – महिला अजिंक्यपद खो खो स्पर्धा २०१७-१८ दि. ८ ते १० डिसेंबर, २०१७ या कालावधीत स्टेडियम, एल. बी. नगर, हैद्राबाद, तेलंगणा येथे संपन्न झाली.
या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजेतेपद प्राप्त केले.
या स्पर्धेतील सर्वोकृष्ट संरक्षक पुरुष खेळाडूचा पुरस्कार महेश शिंदे (महाराष्ट्र), सर्वोकृष्ट आक्रमक पुरुष खेळाडूचा पुरस्कार उमेश सातपुते (कोल्हापूर) तर स्पर्धेतील अष्टपैलू पुरुष खेळाडूचा मान प्रतीक वाईकर (महाराष्ट्र) यास मिळाला.
तर महिलांच्या गटात सर्वोकृष्ट संरक्षक महिला खेळाडूचा पुरस्कार एम. वीणा (कर्नाटक), सर्वोकृष्ट आक्रमक महिला खेळाडूचा पुरस्कार काजल भोर (महाराष्ट्र) तर स्पर्धेतील अष्टपैलू  महिला खेळाडूचा मान प्रियांका भोपी (महाराष्ट्र) हिला मिळाला.