दि. २४ ते २८ मे, २०१७ या कालावधीत नाशिक, महाराष्ट्र येथे २८ वी किशोर – किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेकरीता महाराष्ट्राचे  किशोर – किशोरी संघ निवड करण्यासाठी मैदान चाचणी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
 
कालावधी : दि. ७ मे, २०१७ 
वेळ : सकाळी ७:३० वा. 
ठिकाण : एम. आय. टी. हायस्कुल, कामगार चौक जवळ, एन – ४, सिडको, छत्रपती संभाजीनगर. 
खेळाडू उपस्थिती : दि . ६ मे, २०१७ रोजी सायकांळी ७:०० वाजेपर्यंत
संपर्क : श्री. गोविंद शर्मा – ९४२२२९४१७६ व श्री. विकास सूर्यवंशी – ८०८७००६०००