
फेडरेशन चषक स्पर्धेत महाराष्ट्राचा दुहेरी विजय, उस्मानाबाद
खो खो फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशनच्या वतीने दिनांक ११ ते १३ जानेवारी, २०१७ या कालावधीत उस्मानाबाद येथे २७ वी पुरुष-महिला फेडरेशन चषक राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने कोल्हापूर संघावर तर महाराष्ट्राच्या महिला संघाने कर्नाटक संघावर विजय मिळवीत स्पर्धेत दुहेरी चषकाचा मान मिळविला.
पुरुषांमध्ये कर्नाटक व तेलंगणा तर महिलांमध्ये केरळ व दिल्ली यांनी तृतीय स्थान मिळविले.