खो खो दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!

१२ डिसेंबर हा माननीय नामदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचा जन्मदिन आहे. मा. ना. शरदचंद्रजी पवार साहेब हे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे जवळपास २९ वर्ष अध्यक्ष होते. मा. साहेबांच्या मुळेच महाराष्ट्राच्या मातीतील हा मराठमोळा रांगडा खेळ पूर्ण देशभर व आशियाई पातळीवर पोहोचला. खो-खो खेळाच्या वाढ, विकास, प्रसार व प्रचार यामध्ये मा. साहेबांचे योगदान हे फार मोठे आहे. त्यामुळे राज्य संघटनेच्या वतीने दरवर्षी १२ डिसेंबर हा दिवस ‘खो-खो दिन’ म्हणून साजरा केला जातो.