अखिल भारतीय खो खो महासंघाच्या मान्यतेने उत्तर प्रदेश खो खो असोसिएशनच्या वतीने ३६ वी कुमार व मुली गटाची राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा २०१६-१७ दि. ११ ते १५ नोव्हेंबर, २०१६ या कालावधीतआजमगढ, उत्तर प्रदेश येथे संपन्न झाली.
 या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजेते पद प्राप्त केले.
या स्पर्धेतील सर्वोकृष्ट कुमार खेळाडूचा वीर अभिमन्यु पुरस्कार महाराष्ट्राच्या कु. तेजस मगर याला तर मुलीच्या गटातील सर्वोकृष्ट मुली खेळाडूचा जानकी पुरस्कार महाराष्ट्राच्याच कु. अपेक्षा सुतार हिला मिळाला.