अखिल भारतीय खो खो महासंघाच्या मान्यतेने नागपूर महानगरपालिकेतर्फे व विदर्भ खो खो असोसिएशनच्या वतीने ५० वी पुरुष – महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०१६-१७ दि. १९ ते २३ ऑक्टोबर, २०१६ या कालावधीत यशवंत स्टेडियम, नागपूर, महाराष्ट्र येथे संपन्न झाली.
महाराष्ट्राच्या पुरुष संघाने या स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळविला तर महिलांच्या संघाने निर्विवाद पणे प्रथम क्रमांक प्राप्त केला.

या स्पर्धेतील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा एकलव्य पुरस्कार श्री. दीपेश मोरे (भारतीय रेल्वे) तर सर्वोत्तम महिला खेळाडूचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार कु. ऐश्वर्या सावंत (महाराष्ट्र) हिला प्राप्त झाला.