पुरुष-महिला व किशोर-किशोरी संघाचा राष्ट्रीय स्पर्धेत चौकार 
१० ते १२ जून, २०१६ या कालावधीत भुवनेश्वर, ओरीसा येथे पार पडलेल्या २६ व्या फेडरेशन चषक खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष-महिला संघांनी जेतेपद मिळविले. पुरुष संघाने कोल्हापूर तर महिला संघाने कर्नाटक संघास हरवून स्पर्धेतील दुहेरी विजय साजरा केला.
तर २७ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी अंतिम विजेतेपद मिळविले. किशोर संघाने झारखंड तर किशोरी संघाने कर्नाटक संघास हरवून महाराष्ट्राने स्पर्धेतील दुहेरी विजय नोंदविला.
कु. साक्षी करे हिला किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वोत्तम किशोरी खेळाडूचा इला पुरस्कार तर कु. शुभम थोरात यास सर्वोत्तम किशोर गटातील खेळाडूचा भरत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.