इंदोर येथे झालेल्या तिसरया आशियाई खो खो अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुष व महिला संघांनी विजय संपादन केला. दोन्ही संघानी प्रतिस्पर्धी बांगलादेशास हरवून अंतिम विजय प्राप्त केला. 
 
या स्पर्धेत अनिकेत पोटे व सारिका काळे या दोन्ही महाराष्ट्राच्या खेळांडूना स्पर्धेतील सर्वोकृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. 

३री आशियाई खो खो  अजिंक्यपद  स्पर्धा २०१६, इंदौर, मध्य प्रदेश.

स्पर्धा कालावधी :  ८ ते १० एप्रिल, २०१६

स्पर्धा स्थळ : प्रभाकर दादा इनडोअर स्टेडीयम, हैप्पी वोंडरर्स, सबनीस बाग, शांतीपथ,  इंदौर, मध्य प्रदेश.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील खालील खेळाडूंची भारताच्या संघात निवड झाली आहे.

नरेश सावंत (सांगली),  अनिकेत पोटे (मुंबई उपनगर)

सुप्रिया गाढवे – कर्णधार (उस्मानाबाद), ऐश्वर्या सावंत (रत्नागिरी) व सारिका काळे ((उस्मानाबाद)