
४९ वी पुरुष – महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा, सोलापूर
आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सोलापूर अम्युचर खो खो असोसिएशनने ४९ वी पुरुष – महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०१५ दिनांक २३ ते २७ नोव्हेंबर, २०१५ या कालावधीत इंदिरा गांधी स्टेडीयम (पार्क मैदान) सोलापूर येथे आयोजीत केली होती.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघानी स्पर्धेतील सर्व आव्हान मोडीत काढत अंतिम विजयावर शिक्कामोर्तब केला. पुरुष संघाने सलग सहा वर्ष विजेत्या भारतीय रेल्वेच्या संघाला मात देत विजय संपादन केला तर महिला संघाने कर्नाटक संघास नमवून विजय मिळविला.