दिनांक १ ते ५ फेब्रुवारी, २०१५ या कालावधीत केरळ येथे झालेल्या ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी अंतिम विजयी स्थान संपादित करून सुवर्ण पदक संपादन केले.

या दोन्ही संघातील खेळाडूंचा सत्कार दिनांक २ मार्च, २०१५ रोजी श्री शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे क्रीडा व युवक संचनालय, महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या सहकार्याने मान. क्रीडामंत्री श्री. विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमास महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे व महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार साहेब व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सर्व मान्यवर पदाधिकारी, खेळाडू, पालक आवर्जून उपस्थित होते.