महाराष्ट्र खो-खो असोसिएशन तर्फे यापुढील सर्व स्पर्धांबाबतची परिपत्रके/ प्रवेश अर्ज इ. ​​महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या सांकेतिक स्थळावर उपलब्ध करून दिली जातील. तसेच सर्व स्पर्धांचे प्रवेश अर्ज सुद्धा सांकेतिक स्थळावरच ​​स्वीकारले जातील. सदर ​​प्रवेश अर्ज सांकेतिक स्थळावर टाकण्याबाबतची माहिती ​​खाली दिली आहे.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या www.mkka.org या सांकेतिक स्थळावर परिपत्रके या सदरात आगामी स्पर्धांची व इतर परिपत्रके उपलब्ध असतील. सदर परिपत्रके / प्रवेश अर्ज आपल्या कॉम्पुटर मध्ये डाऊनलोड करून घेणे. सदर सर्व माहिती गुगल मराठी या फॉन्ट मध्येच भरावयाची आहे. इतर कुठल्याही मराठी फॉन्ट मध्ये भरलेले प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

सदर प्रवेश अर्ज हे एक्सेल (Excel) या स्वरुपात असतील.

सदर संपूर्ण माहिती भरून झाल्यावर स्पर्धा प्रवेशिका या सदरात असलेल्या फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरून Choose File / Browse येथे क्लिक करून आपल्या कॉम्पुटर मध्ये असलेली प्रवेश अर्जाची फाईल (Excel) अपलोड करावी.

​​आपल्या कॉम्पुटर मध्ये गुगल मराठी हा Font ​कसा टाकावा याची सविस्तर माहिती खालील लिंक मध्ये दिलेली आहे.

http://www.google.com/inputtools/windows/installation.html

​किंवा
​​जर कॉम्पुटर मध्ये गुगल मराठी हा Font टाकण्यास सोयीस्कर होत नसल्यास Google Search मध्ये Try Google Input Tools online ​हे टाकून ऑनलाइन मराठी टाईप करून आपल्या हव्या असलेल्या ठिकाणी पेस्ट करणे.