महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची सन २०१३-१४ ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २४ ऑगस्ट, २०१४ रोजी दुपारी १२.३० वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे संपन्न झाली. सभेचे अध्यक्ष स्थान जेष्ठ उपाध्यक्ष सन्माननीय श्री. नथुराम पाटील यांनी भूषविले.

या सभेत महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या २०१४ ते २०१८ करीता झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. सदर निवडणुकीकरीता निरीक्षक म्हणून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे माननीय श्री. बाळासाहेब लांडगे व खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे माननीय श्री. रामदास दरणे हे उपस्थित होते.

खालील सर्व मान्यवरांची महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या २०१४ ते २०१८ करीताच्या कार्यकारिणीवर बिनविरोध निवड झाली.

पदाधिकारी

अध्यक्ष मान.  श्री. अजितदादा पवार पुणे
उपाध्यक्ष श्री. महेश गादेकर सोलापूर
 –”– श्री. बाळासाहेब जामकर परभणी
 –”– श्री. पी. जी. शिंदे सातारा
 –”– श्री. विश्वनाथ गायकवाड लातूर
कार्याध्यक्ष श्री. मंदार देशमुख नाशिक
सरचिटणीस श्री. डॉ. चंद्रजीत जाधव उस्मानाबाद
खजिनदार श्री. तुषार सुर्वे मुंबई
सहचिटणीस श्री. कमलाकर कोळी ठाणे
 –”– श्री. गोविंद शर्मा औरंगाबाद
 –”– श्री. सचिन गोडबोले पुणे
 –”– श्री. गजानन मगदूम सांगली
 –”– सौ. चित्रा आगळे बीड
विश्वस्त श्री. नथुराम पाटील रायगड
 –”– श्री. जे. पी. शेळके बीड
 –”– श्री. हणमंत पवार सांगली
 –”– श्री. डॉ. चंद्रजीत जाधव उस्मानाबाद
 –”– श्री. तुषार सुर्वे मुंबई

 

[divide]