आंतरशालेय साखळी खो-खो स्पर्धा – औरंगाबाद

औरंगाबाद जिल्हा खो खो संघटनेमार्फत सान्या चषक आंतरशालेय साखळी खो-खो स्पर्धांचे आयोजन २५ जुलै, २०१४ पासून धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आलेले होते.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा खो खो संघटनेचे सचिव श्री. गोविंद शर्मा यांच्या सोबत प्रा. युसुफ पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले.

या स्पर्धेचे विशेष म्हणजे भारतात प्रथमच आंतरशालेय खो-खो स्पर्धांचे आयोजन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅटवर करण्यात आलेले होते.

[divide]