राज्यस्तरीय पंच शिबीर (२०२५-२६)
राज्यस्तरीय पंच शिबीर (२०२५-२६)
शनिवार दि. १९ व रविवार दि. २० जुलै, २०२५ रोजी महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने सातारा जिल्हा अमेच्युर खो खो असोसिएशनच्या अधिपत्याखाली श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे राज्यस्तरीय पंच शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे नियोजन तांत्रिक समिती व पंच मंडळ यांनी संयुक्त रित्या केलेले होते. या शिबिरात राज्यभरातील जुन्या व नवीन अश्या एकूण ४०६ पंचानी सहभाग घेतला होता. एकूण ५८० जणांनी या शिबिरात सहभाग होता. राज्य संघटनेच्या नोंदीनुसार प्रथमच या शिबिरास एवढा प्रचंड प्रतिसाद लाभला होता.
हे शिबीर संपन्न होण्यासाठी राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. सचिन गोडबोले, भारतीय खोखो महासंघाचे माजी सहकार्यवाह व राज्य संघटनेचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव, भारतीय खोखो महासंघ व राज्य संघटनेचे खजिनदार अॅड. श्री. गोविंद शर्मा, स्पर्धा नियोजन समितीचे श्री. संदीप तावडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
राज्य संघटनेचे अध्यक्ष श्री. संजीवराजे निंबाळकर साहेब, सातारा जिल्हा अमेच्युर खो खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री. मनोहर यादव, सचिव श्री. महेंद्रकुमार गाढवे, खजिनदार श्री. प्रशांत कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे पंच शिबीर यशस्वी होण्यासाठी बहुमोल सहकार्य केले.
पंच मंडळाचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री. प्रशांत पाटणकर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. श्री. नरेंद्र कुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पंच मंडळ व तांत्रिक समिती सदस्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शिबिराचं आयोजन, नियोजन, व्यवस्थापन डिजिटल माध्यमातून करण्यात आले होते. यांना पंच मंडळ अध्यक्ष श्री. सुधाकर राऊळ व तांत्रिक समिती अध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ गजमल यांचे मार्गदर्शन केले.
सदर शिबिरातील काही क्षणचित्रे …..
















































