अॅड. श्री. गोविंद शर्मा यांची फेडरेशनच्या खजिनदार पदी बिनविरोध निवड
भारतीय खो खो महासंघाची सन २०२५ ते २०२९ या कार्यकालासाठी निवडणूक बिनविरोध पार पडली.
महासंघाच्या नवीन कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे खजिनदार अॅड. श्री. गोविंद शर्मा यांची फेडरेशनच्या खजिनदार पदी बिनविरोध निवड झाली. तसेच महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या स्विकृत उपाध्यक्षा सौ. अश्विनी पाटील यांची सदस्य पदी निवड झाली.
अध्यक्षपदी श्री. सुधांशू मित्तल (दिल्ली) यांची निवड झाली तर पंजाबच्या उपकार सिंग विर्क यांची महासचिव पदावर निवड झाली.
