शुक्रवार दि. १८ एप्रिल, २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे सन २०२२-२३ व सन २०२३-२४ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. श्री. सी. पी. राधाकृष्णन, राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते खेळाडू व मार्गदर्शक यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले.

खो खो क्षेत्रातील खालील मार्गदर्शक व खेळाडू यांना सुद्धा हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

शिव छत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार (सन २०२२-२३) – श्री. प्रवीण तानाजी बागल (धाराशिव जिल्हा)

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू र (सन २०२२-२३) – श्री. सुयश विश्वास गणपुले (पुणे जिल्हा)

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू (सन २०२२-२३) – कु. प्रियांका हनुमंत इंगळे (पुणे जिल्हा)

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू (सन २०२३-२४) – श्री. हृषीकेश विजय मुर्चावडे (मुंबई उपनगर जिल्हा)

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू (सन २०२३-२४) – कु. गौरी राजेश शिंदे (धाराशिव जिल्हा)