५७ वी पुरुष व महिला गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा (२०२४-२५), पुरी, ओडिसा
दि. ३१ मार्च ते ४ एप्रिल, २०२५ या कालावधीत भारतीय खो खो महासंघाच्या मान्यतेने ओडिसा खो खो असोसिएशनने ५७ व्या पुरुष व महिला गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा मैदान, पुरी, ओडिसा येथे केले होते.
महाराष्ट्राच्या महिला संघाने अंतिम फेरीत ओडिसा संघावर मात करीत राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील आतापर्यंतचा २६ वा विजय मिळविला. तर पुरुष संघास अंतिम फेरीत भारतीय रेल्वे संघाकडून पराभव पत्करावा लागला.
स्पर्धातील सर्वोकृष्ट पुरुष खेळाडूचा एकलव्य पुरस्कार श्री. जगन्नाथ दास (भारतीय रेल्वे) याला देण्यात आला तर महिला गटातील सर्वोकृष्ट खेळाडूचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार कु. तन्वी भोसले (धाराशिव, महाराष्ट्र) हिला देण्यात आला.













