६० वी पुरुष – महिला गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा (२०२५), शेवगाव, अहिल्यानगर

महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने हिरक महोत्सवी ६० वी पुरुष व महिला गटाची राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा दि. १३ ते १६ मार्च, २०२५ या कालावधीत अहमदनगर जिल्हा खो खो असोसिएशन व शेवगाव स्पोर्टस् बहुउद्देशीय फौंडेशन, सत्यभामा प्रतिष्ठान शेवगाव व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्टस् , कॉमर्स आणि सायन्स कॉलेज शेवगाव.यांच्या सहकार्याने खंडोबा मैदान, शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजीत करण्यात आली होती.

या स्पर्धेचे उद्घाटन आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सह सचिव व महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव श्री. डॉ. चंद्रजीत जाधव, खजिनदार ॲड. श्री. गोविंद शर्मा, पीएमटी शिक्षण संकुलाचे कार्यकारी संचालक श्री. पंजाबराव आहेर यांच्यासोबत असोसिएशनचे सहसचिव डॉ. राजेश सोनावणे, डॉ. पवन पाटील, श्री. जयांषु पोळ, कार्यालयीन सचिव डॉ. प्रशांत इनामदार, डॉ. किरण वाघ, श्री. रमेश लव्हाट,  भारताच्या पुरुष संघाचे कर्णधार श्री. प्रतिक वाईकर व महिला संघाची कर्णधार कु. प्रियांका इंगळे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

राज्य संघटनेस सलंग्न असणाऱ्या २३ जिल्ह्याच्या पुरुष व महिला संघानी या स्पर्धेत भाग घेतला होता त्यामुळे सदर स्पर्धा दर्जेदार झाली.

खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने ओडिसा खो खो असोसिएशनने आयोजित केलेली ५७ वी पुरुष – महिला गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा (२०२४-२५) दि. ३१ मार्च ते ४ एप्रिल, २०२५ या कालावधीत पुरी, ओडिसा येथे होणार आहे. सदर स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघांची निवड करण्यासाठी तज्ञ अश्या निवड समिती सदस्य श्री. मंदार कोळी (ठाणे), श्री. जगदिश दवणे (पालघर), श्री. विशाल भिंगारदिवे (सांगली) व श्रीमती नंदिनी धुमाळ (मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आलेली होती.

यंदा स्पर्धेतील पुरुष गटात विजेते पद पुणे संघाने व उपविजेते स्थान मुंबई उपनगर, महिला गटात विजेते पद धाराशिव संघाने तर उप विजेते स्थान सांगली जिल्ह्याने मिळविले.

या स्पर्धेचा पारितोषिक समारंभ मा. श्री.  संतोष काकडे ( तहसीलदार, चिखली) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सह सचिव व महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव श्री. डॉ. चंद्रजीत जाधव, उपाध्यक्षा सौ. अश्विनी पाटील, कार्याध्यक्ष श्री. सचिन गोडबोले, खजिनदार ॲड. श्री. गोविंद शर्मा, सहसचिव डॉ. राजेश सोनावणे, डॉ. पवन पाटील, श्री. जयांषु पोळ, श्री. बाळासाहेब तोरसकर, कार्यालयीन सचिव डॉ. प्रशांत इनामदार, डॉ. किरण वाघ, श्री. रमेश लव्हाट तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

हि हिरक महोत्सवी ६० वी पुरुष व महिला गटाची राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शेवगाव स्पोर्टस् बहुउद्देशीय फौंडेशन, सत्यभामा प्रतिष्ठान शेवगाव व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्टस् , कॉमर्स आणि सायन्स कॉलेज शेवगाव यांच्या सर्व खेळाडू व कार्यकर्ते यांनी हातभार लावला.

या स्पर्धेतील सर्वोकृष्ट खेळाडू खालीलप्रमाणे

पुरुष गट महिला गट
सर्वोकृष्ट संरक्षक : अनिकेत चेंदवणकर (मुंबई उपनगर) सर्वोकृष्ट संरक्षक : अश्विनी शिंदे (धाराशिव)
सर्वोकृष्ट आक्रमक : सुयश गरगटे (पुणे) सर्वोकृष्ट आक्रमक : सानिका चाफे (सांगली)
अष्टपैलू खेळाडू : शुभम थोरात (पुणे) अष्टपैलू खेळाडू : संध्या सुरवसे (धाराशिव)
राजे संभाजी पुरस्कार : शुभम थोरात (पुणे) राणी अहिल्या पुरस्कार : संध्या सुरवसे (धाराशिव)

स्पर्धेतील काही क्षणचित्रे ….