विश्वचषक खो खो स्पर्धेत भारतीय संघास दुहेरी चषक……
दिनांक १३ ते १९ जानेवारी, २०२५ या कालावधीत इंदिरा गांधी इनडोर स्टेडियम, नवी दिल्ली येथे विश्वचषक खो खो स्पर्धा – २०२५ आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेत जगभरातील २४ देश सहभागी झाले होते.
भारताने या पहिल्याच विश्वचषक खो खो स्पर्धेतील दोन्ही अजिंक्यपद जिकून एक वेगळा इतिहास रचला आहे.
काही क्षणचित्रे …
भारतीय खो खो महासंघाने या विश्वचषक खो खो स्पर्धेकरीता महाराष्ट्रातील मान्यवरांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात केलेली होती.
डॉ. प्रा. श्री. चंद्रजीत जाधव (धाराशिव) – स्पर्धा व्यवस्थापक व आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी
श्री. प्रशांत पाटणकर (मुंबई उपनगर) – सह आयोजक व आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी
अड. श्री. गोविंद शर्मा (छत्रपती संभाजी नगर) – भारतीय संघ निवड समिती सदस्य
श्री. सचिन गोडबोले (पुणे), श्री. संदीप तावडे (रत्नागिरी), श्री. सुरेंद्रकुमार विश्वकर्मा (मुंबई), श्री. नानासाहेब झांबरे (पुणे), श्री. रफिक शेख (जालना), श्री. किशोर पाटील (ठाणे), श्री. संदेश आम्रे (मुंबई उपनगर), श्री. किरण वाघ (पुणे) या सर्वांची विश्वचषक स्पर्धेतील आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून निवड करण्यात आलेली होती.
श्री. भूषण कदम (पुणे) यांची स्पर्धेचे “मुख्य अधिकृत प्रवर्तक” (Chief Official Promoter) म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्यासोबत श्री. बाळासाहेब तोरस्कर (मुंबई), श्री. अजित संगवे (सोलापुर) यांनी प्रसिद्धीचे काम पाहिले.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघात महाराष्ट्रातील खालील खेळाडूंची निवड करण्यात आली होती.
पुरुष संघ – श्री. प्रतिक वाईकर (पुणे) – कर्णधार, श्री. सुयश गरगटे (पुणे), श्री. रामजी कश्यप (सोलापूर), श्री. अनिकेत पोटे (मुंबई उपनगर), आदित्य गणपुले (पुणे) तर राखीव खेळाडू – श्री. अक्षय भांगरे (मुंबई उपनगर)
महिला संघ – कु. प्रियांका इंगळे (पुणे) – कर्णधार), कु. अश्विनी शिंदे (धाराशिव), कु. रेश्मा राठोड (ठाणे). राखीव खेळाडू – कु. संपदा मोरे (धाराशिव) व प्रियांका भोपी (ठाणे)