खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि उत्तर प्रदेश खो-खो असोसिएशन आयोजित ४३ वी राष्ट्रीय अजिंक्यपद कुमार – मुली गट खो-खो स्पर्धा दि. २५ ते २९ नोव्हेंबर, २०२४ या कालावधीत अहिल्यावाई होळकर स्टेडीयम, अलीगड, उत्तर प्रदेश येथे संपन्न झाली. महाराष्ट्राने याही वर्षी दुहेरी मुकुट मिळवला.

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी प्रतिस्पर्धी ओरिसा संघावर विजय मिळवीत स्पर्धेतील दुहेरी चषकाचा मान मिळविला. विशेष बाब म्हणजे कुमार संघाचा हा सलग १९ वा तर मुली संघाचा हा सलग १० विजय आहे.

या स्पर्धेतील कुमार गटातील सर्वोकृष्ट खेळाडूचा वीर अभिमन्यू पुरस्कार कु. जितेंद्र वसावे (धाराशिव) याला तर मुलींच्या गटात जानकी पुरस्कार कु. सुहानी धोत्रे (धाराशिव) हिला देऊन गौरवण्यात आले