५० वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा (२०२४), धाराशिव
५० वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा (२०२४), धाराशिव
महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेने सुवर्ण महोत्सवी ५० वी कुमार व मुली गटाची राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा द उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशनने दि. २७ ते ३० ऑक्टोबर, २०२४ या कालावधीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र, नीरज गॅस एजन्सीजवळ, धाराशिव येथे आयोजीत करण्यात आली होती.
या स्पर्धेचे उद्घाटन धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान. डॉ. सचिन ओंबासे व लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक श्री. गणपतराव मोरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री. सचिन गोडबोले, उपाध्यक्षा सौ. अश्विनी पाटील, सचिव श्री. डॉ. चंद्रजीत जाधव, खजिनदार ॲड. श्री. गोविंद शर्मा, सहसचिव डॉ. राजेश सोनावणे, श्री. जयांषु पोळ, कार्यालयीन सचिव डॉ. प्रशांत इनामदार, अर्जुन पुरस्कार प्राप्त सौ. सारिका काळे, द उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव श्री. प्रवीण बागल, खजिनदार श्री. निशिकांत देशमुख यांच्यासोबत अनेक मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत राज्य संघटनेस सलंग्न असणाऱ्या सर्व जिल्ह्याच्या कुमार व मुली संघानी भाग घेतला होता त्यामुळे सदर स्पर्धा दर्जेदार झाली.
या स्पर्धेतून दि. २५ ते २९ नोव्हेंबर, २०२४ या कालावधीत महाराणी अहिल्यावाई होळकर स्टेडीयम अलीगड, उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या कुमार व मुली गट राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राचा कुमार व मुली संघ तज्ञ अश्या निवड समिती सदस्य ॲड. गोविंद शर्मा (छ. संभाजी नगर) (श्री. रमेश नांदेडकर, नांदेड यांचे बदली), श्री. प्रशांत कदम (सातारा), श्री. संदीप चव्हाण (पुणे) आणि सौ. भावना पडवेकर (ठाणे) यांनी निवडले.
यंदा स्पर्धेतील कुमार व मुली गटातील प्रथम स्थान धाराशिव जिल्ह्याने तर द्वितीय स्थान सांगली जिल्ह्याने संपादन केले. दोन्ही गटातील तृतीय स्थान अनुक्रमे सोलापूर व पुणे तर मुली गटात सोलापूर व ठाणे या जिल्ह्यानी प्राप्त केले.
या स्पर्धेचा पारितोषिक समारंभ मा. श्री. दुलबा ढाकणे (पोलीस उपअधिक्षक, सोलापुर) व सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. सौ. वृषाली लामतुरे (वारद) (नेत्र रोग तज्ञ, पुणे), डॉ. दयानंद जटनुरे (प्राचार्य डायट कॉलेज, धाराशिव), मराठी चित्रपट सुष्टीतील सहाय्यक दिग्दर्शक श्री. संतोष साखरे हे मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री. सचिन गोडबोले, उपाध्यक्षा सौ. अश्विनी पाटील, सचिव श्री. डॉ. चंद्रजीत जाधव, खजिनदार ॲड. श्री. गोविंद शर्मा, सहसचिव डॉ. राजेश सोनावणे, श्री. जयांषु पोळ, कार्यालयीन सचिव डॉ. प्रशांत इनामदार, अर्जुन पुरस्कार प्राप्त सौ. सारिका काळे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री. जनार्दन शेळके सर, द उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव श्री. प्रवीण बागल, खजिनदार श्री. निशिकांत देशमुख यांच्यासोबत अनेक मान्यवर उपस्थित होते.
हि सुवर्ण महोत्सवी ५० वी कुमार व मुली गटाची राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज्य संघटनेचे सचिव डॉ. प्रा. चंद्रजीत जाधव, द उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव श्री. प्रवीण बागल, श्री. प्रभाकर काळे, श्री. अभिजीत पाटील, श्री. आकाश लोखंडे, श्री. विजय यांच्या सोबत धाराशिव जिल्ह्यातील सर्व खेळाडू व कार्यकर्ते यांनी हातभार लावला.
या स्पर्धेतील सर्वोकृष्ट खेळाडू खालीलप्रमाणे
कुमार गट | मुली गट |
सर्वोकृष्ट संरक्षक :कु. विलास सिंगा वळवी (धाराशिव) | सर्वोकृष्ट संरक्षक :कु. सानिका श्रावण चाफे(सांगली) |
सर्वोकृष्ट आक्रमक :कु. प्रज्वल प्रकाश बनसोडे (सांगली) | सर्वोकृष्ट आक्रमक :कु. अश्विनी अप्पासाहेब शिंदे (धाराशिव) |
अष्टपैलू खेळाडू / विवेकानंद पुरस्कार कु. सोट्या कुसना वळवी (धाराशिव) | अष्टपैलू खेळाडू / सावित्री पुरस्कार कु. तन्वी युवराज भोसले (धाराशिव) |